मोठी बातमी! हिमाचल प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’?, काँग्रेस सावध

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

शिमला | गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मतमोजणीनुसार असं चित्र दिसत आहे की, गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांपैकी काॅंग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेशात भाजप अडचणीत असल्याचं दिसत आहे.

सध्याची निकालाची परिस्थीती पाहता भाजपकडून राजकीय हालचाल सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते विनोद तावडे हे शिमल्यात दाखल झाले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर(Jai Ram Thakur) यांच्या निवासस्थानी तावडे आणि ठाकूर यांच्यात चर्चा सुरू आहे.

आता काॅंग्रेसनं ही सावधगिरीची भूमिका घेतली आहे. काॅंग्रेस लवकरच विजयी आमदारांना जयपूरला पाठवण्याच्या तयारीत आहे. आमदार फुटू नयेत, यासाठी काॅंग्रेसनं हा निर्णय घेतला आहे.

काॅंग्रेस विजयी आमदार फुटू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसत आहे. यासाठी स्वत: प्रियंका गांधी (Priyanka Gandhi)मैदानात उतरल्या आहेत. प्रियंका गांघी सध्या शिमल्यात दाखल झाल्या आहेत. तर सोनिया गांधी(Soniya Gandhi) राजस्थानमध्ये दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळं आता हिमाचल प्रदेशच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-