बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक; कलम 144 लागू

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलाचं तापलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा असल्याचं स्पष्ट आहे. आगरा पोलीस कोठडीत असताना एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सफाई कर्मचाऱ्याच्या कुटूंबाला भेटण्यासाठी जात असताना प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी सांगितलं आहे की, इथे कलम 144 लागू आहे. त्यामुळे प्रियंका गांधींना पोलीस लाईन्समध्ये नेण्यात येणार आहे. त्यांना आगऱ्याला जाऊ दिले जाणार नाही. दरम्यान, अनेक दिवसांपासून प्रियंका गांधी योगी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

19 ऑक्टोबर रोजी आगरा येथे 25 लाख रूपये चोरल्याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. आता पोलीस स्टेशनमध्ये सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे तेथील स्थानिक लोकांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मृताच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आणि 1 कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.

एडीजी राजीव कृष्ण यांनी सांगितलं आहे की, हे प्रकरण आधीपासूनच न्यायालयात दाखलं झाल आहे. या आरोपांची जिल्ह्याबाहेर चौकशी करण्यात येणार आहे, असंही राजीव कृष्ण म्हणाले आहेत. पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासोबतच मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रूपयांची मदत उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केली आहे, अशी माहिती देखील राजीव कृष्ण यांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपच्या हुकूमशाही सरकारने पोलिसांचा वापर करून प्रियंका गांधी यांना ताब्यात घेणे निंदनीय आहे. हे घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे, असं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. अन्यायाविरोधात आम्ही लढा सुरूच ठेवू, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! लसीकरणानंतर देखील ‘या’ देशात पाचव्या लाटेची शक्यता

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More