मुंबई | खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. अशातच आता राणा दाम्पत्यांना न्यायालयाचा मोठा झटका बसला आहे. राणा दाम्पत्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
आज राणा दाम्पत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र कोर्टाने या प्रकरणात राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या अर्जावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्यांना 29 एप्रिलपर्यंत कोठडीत रहावं लागणार आहे.
राजद्रोहाच्या आरोपांसाठी जामीन देण्याचा अधिकार दंडाधिकारी कोर्टाला नाही. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी ही याचिका मागे घेत राणांनी थेट सत्र न्यायालय गाठलं होतं. अशातच आजच्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याच्या जामानीच्या याचिकेवर 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
दरम्यान, राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार होते. त्यावरुन शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळाला. दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. अद्यापही याचे पडसाद पहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
“एखादा माथेफिरू हल्ला झाला म्हणून स्वत:च्या ओठाला टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…”
रशियाच्या धमकीला न जुमानता अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
एलॉन मस्क यांनी तब्बल ‘इतके’ पैसे मोजत खरेदी केलं ट्विटर
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी दिलं थेट आव्हान, म्हणाले…
Comments are closed.