मोठी बातमी! पत्नी आणि आईसमोरच रविकांत तुपकरांनी अंगावर पेट्रोल ओतलं

मुंबई | काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. कापूस, सोयाबीनला चांगला भाव द्या आणि अतिवृष्टीची रक्कम द्या अशा मागण्या तुपकर यांनी केल्या होत्या. या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

आता या मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेने आंदोलन चांगलंच पेटलं आहे. कारण शनिवारी आंदोलन सुरू होताच तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत अंगावर पेट्राेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सुदैवाने यावेळी पोलिस सतर्क होते त्यामुळं मोठा अनर्थ टळला. परंतु तुपकर यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर शेतकरी प्रचंड संतापले होते. या आंदोलनात तुपकर यांची आई आणि पत्नीदेखील सहभागी झाल्या होत्या.

यावेळी तुपकर खूप संतापले होते. आम्हाला गोळ्या घाला. आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्हाला मारून टाका. या सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणंदेणं नाही. त्यामुळंच कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

सरकारला लाज वाटत नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. फक्त घोषणा देणारं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं हे सरकार आहे. हे सरकार कृती शून्य आहे, अशा शब्दांत तुपकर यांनी सरकारला सुनावलं.

महत्त्वाच्या बातम्या-