बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! कोरोनाच्या सर्व व्हेरिअंट्सवर ‘हे’ औषध प्रभावी, संशोधकांचा दावा

नवी दिल्ली | कोरोना महामारीने जवळपास गेल्या 2 वर्षांपासून जगभरात थैमान घातलं आहे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ कोरोनावर संशोधन करत आहेत. कोरोना संबंधित अनेक अहवाल आजवर प्रकाशित झाले आहेत. अशातच आता कोरोनावरील उपचारांसाठी विकसित करण्यात आलेलं 2-DG हे औषध कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिअंट्सवर प्रभावी ठरत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

2-DG हे औषध कोरोनाच्या सर्व व्हेरिअंट्सच्या संक्रमणाला रोखू शकतं. तसेच या औषधांमुळे विषाणूचं मल्टीप्लिकेशन देखील कमी होतं, असा दावा संशोधकांनी केला आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या औषधाला मान्यता देण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या B.6 आणि B.1.1.7 या दोन व्हेरिअंट्सवर 2-DG या औषधाचा वापर करुन पाहण्यात आला होता. या दोन्ही व्हेरिअंट्सवर हे औषध प्रभावी ठरलं आहे. 2-DG औषधामध्ये अँटी व्हायरल गुण असल्यानं हे औषध कोरोनाच्या सर्व व्हेरियंट्सवर प्रभावी ठरत असल्याचं आता शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं आहे.

2-DG हे औषध संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेनं विकसित केलं आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. डॉ. रेड्डीज लॅबरोटरीने हे औषध पाऊडरच्या रुपात लाँच केलं आहे. हे औषध पाण्यातून मिसळून घेता येतं.

थोडक्यात बातम्या – 

अभिमानास्पद! जागतिक पातळीवर पुण्याची उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

“शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार”

दैव देतं पण कर्म नेतं! राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा- दिग्विजय सिंह

वाह रे पठ्ठ्या! ‘या’ मराठमोळ्या मुलाने इन्स्टाग्रामवरील ती कमी दाखवली अन् कंपनीने दिले 22 लाख रुपये

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More