मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं.
अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशात अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे.
अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
दरम्यान, अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे. त्याआधी त्यांनी हा इशारा दिल्याचं बोललं जातंय.
महत्वाच्या बातम्या-