बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात दाखल

मुंबई | राज्याचे ग्रामविकास मंत्री रुग्णालयात दाखल झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खराब झाल्यामुळे दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं समोर आलंय.

हसन मुश्रीफ यांना रुग्णालय़ात दाखल केलं आहे मात्र त्यांना नेमकं काय झालं आहे हे अद्याप समजू शकलं नाही. बॉम्बे रुग्णालयाच्या बाराव्या मजल्यावर, डॉ. गौतम भंसाळी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नुकतंच किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या परिवारानं सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली पहायला मिळाली.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे खोटे असून सोमय्यांवर आपण 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं आहे.

थोडक्य़ात बातम्या – 

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?”

“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

मास्क न घातल्यामुळे महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यासोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामं करा- अजित पवार

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More