मोठी बातमी! संभाजीराजेंची प्रकृती ढासळली, तरीही औषधं घ्यायला नकार
मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपोषण सुरु आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून छत्रपती संभाजीराजे उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. अशातच आता संभाजीराजेंची प्रकृती ढासळल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
आज सलग तीन दिवस झाले उपोषण सुरु असून मुंबईतील आझाद मैदानात खासदार संभाजीराजे उपोषणाला बसले आहे. सध्या त्यांची प्रकृती ढासळल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत आहे.
डाॅक्टरांनी संभाजीराजेंची तपासणी केली आहे. संभाजीराजेंचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. उपोषण सुरु असेपर्यंत काहीही न घेण्याची भूमिका राजेंनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता आणखीनच वाढली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत, मराठा आरक्षणबाबत 22 मागण्या पुढे आल्या, त्यापैकी 6 मागण्या आम्ही मांडल्या आहेत. या मागण्यांवर राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं, यासाठी केंद्र सरकारकडे जाण्याची गरज नाही, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी हे उपोषण थांबणं गरजेचं”
“घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो”
“… त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री महोदय अजून किती सहन करायचं”
MSEB विरोधात शेतकरी आक्रमक, अज्ञातानं सबस्टेशन पेटवलं
“उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, विचार करा”
Comments are closed.