मोठी बातमी ! काँग्रेसला धक्का, बाळासाहेब थोरातांचा पदत्याग

मुंबई | सध्याची राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी त्यांच्या विधीमंडळ (Legislature) गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात यांचा वाद विकोपाला गेल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. दुसरीकडे पक्ष थोरातांवर कारवाई करु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती,त्यापूर्वीच थोरातांनी त्यांचा राजीनामा (resignation) सादर केला आहे.

यामुळे काँग्रेस(Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते बाळासाहेब थोरातांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील. अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, गेले काही दिवस नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात यांचं शाब्दिक वाद सुरु होते. नाना पटोलेंनी थोरातांवर अनेक आरोप केले होते. यामुळेच थोरातांनी त्याचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge) यांना पाठवला आहे. पटोलेंसोबत काम करणं अवघड असल्याचं कारण त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केलं आहे. अद्याप हा राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या