बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरु, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई | कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून शाळांना लागलेली कुलूपे अद्याप उघडण्यात आली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. अशातच आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोना परिस्थिती पुर्वपदावर आल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर मोहर लावली आहे.

राज्यभर खूप वेगानं लसीकरण चालू आहे. तिसरी लाट येण्याआधीच तिला रोखण्यात देशाला यश मिळताना दिसत आहे. यामुळे अनेक तज्ञ लोक दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यात काही हरकत नाही, असं चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आता शाळा सुरू होणार असल्यानं लहान मुलांसाठी लसीकरण मोहिम देखील सुरू करणं गरजेचं आहे. तर सरकार महाविद्यालयाविषयी देखील लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

गर्लफ्रेंडचा राग बाॅयफ्रेंडच्या जीवावर बेतला, रागात फेकून मारला फोन अन्…

एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

शेतकऱ्यांना आता 6000 ऐवजी मिळवता येणार पूर्ण 36 हजार रुपये, वाचा सविस्तर

“महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More