बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

पुणे | टीईटी परिक्षेत (TET Exam) म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काल त्यांना अटक केली आहे.

आरोग्य भरती आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची (TET Exam) ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याचा तपास सुरु केला. या तपासात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम सुपे यांच्यावर संशय व्यक्त केला गेला.

टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांनी अटक करण्यात आलं, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी आणखी कोण अधिकारी समाविष्ट आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ आठ जणांना मिळणार तिकीट

‘अविवाहित लोकांच्या हातात देश आहे आणि ते…’; नवाब मलिकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचं सेवन, अन्यथा…

‘…तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

चिंताजनक: महाराष्ट्र राज्य ठरतंय Omicronचं हाॅटस्पाॅट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More