बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार? केंद्रात हालचालींना वेग

नवी दिल्ली | सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण अशा प्रश्नांवरून रोजच राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मात्र, आता केंद्र सरकार आरक्षणासंदर्भात संसदेत एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत दिसत आहे.

इतर मागासवर्ग तयार करणे, या वर्गातील जातींची ओळख करणे, त्यांची वेगळी यादी तयार करणे हे सर्व अधिकार राज्यांचे आहेत. तेच अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक आणण्याच्या हालचाली करत आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी निकाल देताना सुप्रिम कोर्टाने राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता केंद्र सरकार या संदर्भात विधेयक आणण्याच्या तयारीत दिसत आहे. आरक्षण हा खूप संवेदनशील मुद्दा आहे. केंद्र सरकार याबाबत कोणत्याही प्रकारचा धोका घेऊ इच्छित नाही. यामुळे केंद्र सरकार ही पाऊले उचलत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. तेव्हापासून ओबीसी आरक्षणावरुन वाद चांगलाच पेटला आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनाकाळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्यानं ग्रामस्थांनी विकली किडनी अन्….

कोरोना झाल्यानं तरुणानं वाढदिवसादिवशीच उचललं धक्कादायक पाऊल!

काँग्रेस नेत्यांची सायकलवरुन राजभवनाकडे कूच, विविध प्रश्नांवर राज्यपालांना निवेदन

‘या’ महापालिका क्षेत्रात आजपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला सुरुवात

‘वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?’; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पवारांवर निशाणा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More