बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

नवी दिल्ली | बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) सशर्त परवानगी दिली आहे.

आज झालेल्या या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली असल्याचा महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2014 साली मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. यानंतर राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. राज्य सरकारच्या वतीने आज मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून विधानसभेपर्यंत मागणी झाली. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी अनेकदा आंदोलनं देखली झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात तब्बल सात वर्षानंतर बैलगाडा शर्यत सुरू होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

अंकिता लोखंडेला पतीने लग्नात दिलं खास गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

Gold Silver Price: सोने चांदीचे भाव पुन्हा वधारले; वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे दर

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More