बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार

मुंबई | महाराष्ट्रासह राजधानी मुंबईतही कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दररोज 10 हजारांच्या पटीत वाढत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा ही लॉकडाऊन काळात बंद होणार नसून गर्दीचं विभाजन करण्याचं काम केलं जाईल, असं म्हटलं होतं. परंतु आता त्यांनी लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्र सरकार मुंबईच्या लोकलवर कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे पुन्हा एकदा निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मुंबईचा लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्णपणे लोकल बंद करावी की, मागच्यावेळी असलेले निर्बंध पुन्हा लागू करावेत, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत दररोज 10 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलवर कोणते निर्बंध आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

भाषण चालू असताना अजित पवारांना चिठ्ठी आली, ‘दादा मास्क काढा’; अजित पवार म्हणाले…

‘…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात देऊन टाका’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

रिमोटवरुन झाली भांडणं अन् आईने रागाच्या भरात स्वतःच्याच चिमुकलीला…

‘या’ गावातील लोक कपडे घालत नाहीत , पर्यटकांना देखील कपडे न घालण्याचा नियम लागू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More