बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील मंदिरं उघडणार; मुख्यमंत्र्यांकडून सुधारित आदेश जारी

मुंबई | गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यानं मंदिरं पुन्हा खुली करावीत, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजप आध्यात्मिक आघाडीने मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तर भाजप राज्यभर आंदोलन करताना दिसत होती. त्यातच आता मंदिरं उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत नवीन सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात यावी यासाठी भाजपने आंदोलन केलं होतं. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं केली होती. यावेळी आंदोलन करताना भाजपने आक्रमक पवित्रा घेत नियम मोडून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न देखील केल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान, लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत, त्याचबरोबर उपहारगृह सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत”

पंतप्रधान मोदींचा मुत्सद्दीपणा! कमला हॅरिस यांना दिलं ‘हे’ खास गिफ्ट

“तिला 52 दिवस तुरूंगात ठेवलं, आता राऊतांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करूच नयेत”

”महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन”

गडकरी साहेबांचा फोन आला, अजित जरा लवकर ये…’; अजित पवारांनी सांगितला किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More