बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार काढणार अध्यादेश

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ नये, अशी भूमिका सर्वच पक्षाने घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यावर आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आहे. त्यासाठी आपण राज्यात अध्यादेश काढणार आहोत. त्यामुळे 10 ते 20 टक्के जागा कमी होतील मात्र, आम्ही ओबीसींच्या 90 टक्के जागा वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याआधी आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांनी देखील अध्यादेश काढले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह दोन वेळा बैठक झाल्याचं देखील छगन भुजबळांनी सांगितलं आहे. तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलंडणार नाही, असंही या बैठकीत ठरलं असल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

….म्हणून श्रीपाद छिंदमला पुन्हा अटक, ‘त्या’ प्रकरणामुळे अडचणीत!

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

मैदानावर पुन्हा आवाज घुमणार! प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मला रोहित शर्मासारखं…’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूची बायको रोहितवर फिदा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More