बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ राज्यात 6 जुलैपासून शिक्षण संस्था चालू होणार; वाचा काय आहेत गाईडलाईन्स

पटना |  कोरोनामुळे जवळपास गेल्या वर्षभरापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बाजारपेठांनंतर बिहारमध्ये आता शाळा महाविद्यालये देखील चालू करण्यात येणार आहेत. येत्या 6 जुलैपासून बिहारमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात महाविद्यालये आणि विद्यापीठे उघडली जातील. पुढील टप्प्यात अकरावी आणि बारावीसह सर्व कोचिंग संस्था सुरू करण्यात येतील. तर तिसर्‍या टप्प्यात माध्यमिक व प्राथमिक शाळा सुरू होतील, अशी माहिती बिहारचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या 19 एप्रिलपासून राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत.

बिहारमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची भीती कमी झाल्यानंतर आता शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्था चालू करण्याची तयारी सुरू केली आहे. कोविड प्रोटोकॉल अंतर्गत सुरक्षा मानदंडांचे पालन करून पुन्हा शैक्षणिक संस्था उघडल्या जाणार आहेत. याची सुरुवात सहा जुलैपासून होणार आहे.

शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी म्हणाले की, शाळा-महाविद्यालये चालू झाल्यानंतर देखील ऑनलाईन वर्ग घेण्यात येतील. केवळ 50% विद्यार्थ्यांसह ऑफलाइन वर्ग सुरु केले जातील. विद्यार्थ्यांना अल्टरनेट पद्धतीने बोलावण्यात येईल. केवळ तेच विद्यार्थी ऑफलाइन वर्गांमध्ये प्रवेश करू शकतील, ज्यांचे पालक परवानगी देतील.

थोडक्यात बातम्या – 

आजपासून ‘या’ जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

आजही सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर; वाचा ताजे दर

…..म्हणून लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन नवरोबा झाडावर जाऊन बसला

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

महाराष्ट्रात उद्यापासून नवे निर्बंध लागू; काय सुरू?, काय बंद?, नागरिकांमध्ये मोठा संभ्रम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More