बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! डेल्टा प्लस कोरोनानं घेतला पहिला बळी

भोपाळ | देशात सध्या डेल्टा प्लस व्हेरियंट हा कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालेला नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकारामुळे सरकारची चिंता अधिक वाढली आहे. त्याचा फैलाव होण्याचा वेग, संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचा धोका देखील जास्त असू शकतो. अशातच डेल्टा प्लस कोरोनाची लागण झालेल्या एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

डेल्टा प्लसचा अभ्यास सुरू आहे. यातच आता डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या या महिलेनं कोरोना लस घेतली नसल्याचं समोर आलं आहे. सुदैवानं कोरोना लस घेतलेला तिचा नवरा पूर्णपणे ठीक आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट हा प्रामुख्यानं महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेशाच्या काही भागांमध्ये आढळून आला आहे. लवकर प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी या राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सध्या देशात या विषाणूचा संसर्ग झालेले 40 रुग्ण आहेत. या प्रकारामुळे सरकारची चिंता अधिक वाढली आहे.

दरम्यान, सध्या या विषाणूच्या प्रकाराबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आपण सध्याचे कोरोना प्रतिबंधाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. दोन मास्कचा वापर, गर्दी टाळणे, लसीकरण मोहीम सुरु ठेवणे हे सुरुच राहायला हवं.

थोडक्यात बातम्या – 

कौतुकास्पद! भर पावसात जेसीबी चालकाची माणुसकी, पाहा व्हिडीओ

वर्ल्ड रेकॉर्डसाठीच मोदी सरकारची साठेबाजी?- पी. चिदंबरम

राष्ट्रवादीतील प्रस्थापितांना दे धक्का, जयंत पाटलांच्या आणखी एका नातेवाईकाला मोठं पद!

“कोरोनाचे नियम पाळूच पण मूर्ती मात्र उंचच आणू”

“ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More