बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, अशा प्रकारे पाहा निकाल

मुंबई | कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षा राज्य सरकारने रद्द केल्या होत्या. या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 दुपारी एक वाजता निकाल लागणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल उद्या लागणार याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता 10वीचा ऑनलाईन निकाल उद्या 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

अशा प्रकारे पाहा निकाल-

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसबार न दाबता टाईप करावा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचं जे नाव असेल ते  पहिल्या चौकटीत M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे  लिहावीत. यानंतर  तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

 

थोडक्यात बातम्या- 

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पण मृतांच्या संख्येत घट 

“तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरु नका”

‘इसमे गलत क्या है?’; पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

‘जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री’; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून योगींचं कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More