बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र तरीही तज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील कोरोना पुर्णपणे नष्ट झाला नाही. राज्यात कोरोना पुर्णपणे आटोक्यात आला नाही त्यामुळे राज्य सरकारने यंदाच्या वर्षी बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.

2021-22 या चालू आर्थिक वर्षी मर्यादित स्वरुपात 14 ऑगस्ट 2021 पर्यंत बदल्या करण्यात याव्यात त्यानंतर कोणत्याही बदल्या करु नयेत असा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही ताण आल्याने बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित स्वरुपात करण्याच्या दृष्टीने  एकूण कार्यरत पदांच्या 15 टक्के इतक्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांचा पदावरील जास्त कालावधी पूर्ण झाला आहे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्राधान्याने बदली करावी. ही कार्यवाही 31 जुलै2021 पर्यंत पुर्ण करण्यात यावी.त्यानंतर बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त पदांवर विशेष कारणास्तव बदल्या 1 ऑगस्ट 2021 ते 14 ऑगस्ट 2021 या कालावधीतपर्यंत कराव्यात, असंही सरकारने निर्णयात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील आजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मला सुत्र द्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो- देवेंद्र फडणवीस

सोन्या-चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण, पटापट तपासा ताजे दर

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More