मोठी बातमी! भारतीय चलनातून ‘ही’ नोट होणार बाद ?
नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीची(Demonetisation) घोषणा केली. त्यावेळी मोदींनी काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं स्पष्टीकरण दिलं होतं. या निर्णयात एक हजार रूपयांची नोट बंद करून दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली गेली.
नोटबंदीच्या या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर(India Economy) मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. आता पुन्हा नोटबंदी संबधित भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यानंतर विविध चर्चांणा उधाण आलं आहे.
राज्यसभेत बोलताना सुशील कुमार मोदी(Sushil Kumar Modi) म्हणाले आहेत की, 2 हजार रूपयांच्या नोटेमुळं काळ्या पैशात वाढ होत आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षापासून 2 हजार रूपयांची नोट छापली गेली नाही. त्यामुळं ही नोट बंद करण्यात यावी.
ज्यांच्याकडं 2 हजार रूपयांच्या नोटा आहेत, त्यांनी त्या दुसऱ्या चलनात बदलून घ्याव्या. कारण काही दिवसानंतर ही नोट भारतीय चलनातून पूर्ण बाद होईल, असंही मोदी म्हणाले आहेत. परंतु मोदींच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जगामध्ये जेवढे विकसीत देश आहेत. जसं की अमेरिका, जपान, चीन यांसारख्या देशांच्या चलनात कुठंही 100 रूपयांच्या किंमतीपेक्षा जास्त चलन नाही. मग भारतीय चलनात 2 हजाराच्या नोटेचं काय महत्व राहणार आहे, असंही मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले आहेत.
आपण जशी एक हजार रूपयांची नोट बंद केली. त्याचप्रमाणं आता दोन हजार रूपयांच्या नोटीचीही गरज नाही. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता 2 हजार रूपयांच्या नोटेवरून विविध चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.