बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! आज होणारी म्हाडाची परिक्षा रद्द, आता ‘या’ महिन्यात होणार परिक्षा

मुंबई | म्हाडाच्या परिक्षा रद्द (MHADA Exam Cancelled) झाल्या असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हाडा मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज आयोजित केलेली परिक्षा रद्द करण्यात आली आहे. याविषयी गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) याविषयी माहिती दिली.

आजपासून सुरू होणारी म्हाडाची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या परिक्षा होणार नाही, असं ट्विट आव्हांडांनी केलं आहे.

अचानकपणे परिक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय पहायला मिळाली. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं. अचानकपणे परिक्षा रद्द झाली यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा संदर्भात काही जणांनी मध्यस्थांना पैसे दिल्याचे माझ्या कानावर आले आहे. तुम्ही ज्याही कोणत्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते हक्काने परत घ्या, असे ट्विट देखील आव्हाड यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राहुल गांधींची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम 144 लावला जातो”

कोरोना लस घेण्यासाठी दिवसातील योग्य वेळ कोणती?; तज्ज्ञांचा मोठा खुलासा

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

“ज्यांच्यावर छापेमारी झाली ते काय संन्यासी होते का?, कारवाई झाली ती योग्यच”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More