बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! राज्य सरकारचा यु-टर्न; शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर रद्द

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं आता शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यातील ज्या भागात कोरोना रूग्णसंख्या कमी आहे. त्या भागात ऑफलाईल पद्धतीने शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं होतं. त्यानंतर आता शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या जीआरला स्थगिती दिलीये. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि इतर राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर झालेले परिणाम या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर या बैठकीत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सध्या देशात फक्त 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. अद्याप लहान मुलांचं लसीकरण केलं गेलं नाही. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी आम्ही निर्णय घेत आहोत, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून टास्क फोर्सने शाळा सुरू न करण्यावर निर्णय घेत आहे. दहावी आणि खालील वर्गातील विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालं नसल्यानं शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने निर्णयात बदल करत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतलाय.

थोडक्यात बातम्या-

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे जमा होणार

“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”

हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार

रानडे इंस्टिट्युटचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी; रानडे इंस्टिट्युटला शनिवारी भेट देणार

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More