बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! उदयनराजे आणि संभाजीराजेंची होणार पुण्यात भेट ‘या’ विषयावर होणार चर्चा

पुणे | मराठा समाजाच्या आरक्षणारून मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारलं असून राज्यभर दौरा करत आहे. मात्र, आता या लढाईला नवं वळण मिळणार आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे  यांची आज पुण्यात भेट होणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे यांची आज पुण्यात दुपारी भेट होणार आहे. पुण्यातील औंध-बाणेर रोडवर असलेल्या एका बंगल्यात ही भेट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र का नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता दोन्ही राजे आज भेटणार असून मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण मिळणार का? याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे.

आज सकाळी कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे भाऊ आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थित होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यात संभाजीराजे यांनी 16 तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

इंग्लंडच्या युवा खेळाडूची वादळी खेळी; केवळ 65 चेंडूत केल्या 136 धावा

हनीमूनला जाताच पत्नीसमोर आलं पतीचं सत्य, त्यानंतर पत्नीनं केलं असं काही की,…

राज्यातील शाळा सुरू होणार?; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा सरसंघचालकांनी खुलासा करावा- संजय राऊत

फोटो शेअर करत एकनाथ खडसेंनी राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More