कीव | रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आणि रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात झाली. रशिया-युक्रेन युद्धाला आता दोन आठवडे उलटले असताना युक्रेनमधील परिस्थिती भयावह झाली आहे.
रशियाने घातलेल्या चार अटी युक्रेनने मान्य केल्या तर युद्ध लगेच थांबवण्यात येईल असं रशियाने म्हटलं असल्याची माहिती समोर आली होती. रशियाने घातलेली एक अट आता युक्रेनने मान्य केली आहे. युक्रेनने नाटो सदस्यत्वाची केलेली मागणी हे देखील रशियाच्या आक्रमणाचं एक कारण होतं.
युक्रेन यापुढे नाटो सदस्यत्वासाठी दबाव आणणार नसल्याचं, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कि यांनी सांगितलं आहे. नाटो युक्रेनला स्विकारण्यास तयार नाही हे समजल्यानंतर आम्ही शांत झालो. नाटो वादग्रस्त गोष्टी आणि रशियाशी संघर्षाला घाबरत आहे, असंही झेलेन्स्कि एका मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, युक्रेनने (Ukraine) रशियाची (Russia) एक अट मान्य केली असल्याचं चित्र आता दिसत आहे. त्यामुळे आता रशिया युद्ध थांबवणार की उर्वरीत अटींवर अडून राहणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
…तर योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, अनेक विक्रम मोडतील
“म्हणजे आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?”
“आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, सत्यता तपासावी लागेल”
“अजित पवार सपोर्ट करत नाहीत, पण बडे साहब सब देख रहे है”
राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी आहेत तरी कोण?, वाचा काय काय म्हणाले राऊत…
Comments are closed.