बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वसंत मोरेंना मनसेचा झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | राज्यातील राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वसंत मोरे (Vasant More)यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे. वसंत मोरे हे देखील मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज अखेर त्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आता नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath babar) यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे.

दरम्यान, पुण्यातील उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुक आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून वसंत मोरे बाहेर पडले होते. त्यामुळे ते मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ गोष्टींमुळे मुली जाऊ लागतात मुलांपासून दूर, वेळीच व्हा सावध

‘देशद्रोही निर्लज्ज माणूस’, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल

एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर

संजय राऊतांचा थेट फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

मोठी बातमी! राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राष्ट्रवादीत प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More