बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादमध्ये उपचार सुरु

नवी दिल्ली | सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश राज यांनी ट्विट करत स्वत: आपल्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. या अपघातात लहान फ्रॅक्चर झाला असल्याने उपचारासाठी हैदराबादला आलो असल्याचं प्रकाश राज यांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, मी पडल्यामुळे लहान फ्रॅक्चर झालं आहे. माझे मित्र डॉ. गुरुवरेड्डी यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी मी हैदराबादला रवाणा झालो आहे. मी लवकरच ठीक होईल. काळजी करण्यासारखं काही नाही.

प्रकाश राज यांनी दिलेल्या अपघाताच्या माहितीनंतर त्यांचे चाहते चिंता व्यक्त करु लागले आहेत. तसेच ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. प्रकाश राज यांचा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलं नाही.

दरम्यान, प्रकाश राज यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सिंघम चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. घिल्ली, वॉन्टेड, अन्नीयन आणि पोकिरी यांसारख्या चित्रपटांतील प्रकाश राज यांची भूमिका वाखाळण्याजोगी आहे. गेली कित्येक वर्ष रुपेरी पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारत ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

दीर्घकाळासाठी मुलांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव राहणार – WHO

आता ‘या’ दिवशी साजरा होणार ‘राष्ट्रीय भालाफेक दिन’

“…तोपर्यंत RSSचा आरक्षणाला भक्कम पाठिंबा”

भारतातील ‘ही’ चार मोठी शहरं पाण्याखाली जाणार; IPCC चा धक्कादायक रिपोर्ट

कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More