बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जम्मू काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

नवी दिल्ली | मोदी सरकारकडून 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 हटवण्यात आलं होतं. यामुळे जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले होते. मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे.

देशभरातील अनेक राजकीय संघटनांनी आणि पक्षांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मोदींनी त्यावेळी दिलेल्या या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सूरु असल्याची माहिती आता मिळत आहे.

माहितीनुसार, जम्मू -काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा देण्यात येईल. मात्र, या प्रदेशाचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. येत्या गुरुवारी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर मधील काही नेत्यांशी या विषयावर चर्चा करणार आहेत. यामुळे गुरुवारची ही चर्चा जम्मू काश्मीरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, 2018 पासून जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका लवकरच घेण्यात येतील, असं आश्वासन देखील मोदी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सर्व पक्षांना देतील. राज्यातील सर्व स्थानिक पक्ष देखील या निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकतील, अशी माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…- गोपीचंद पडळकर

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More