बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! किंग कोहली कर्णधारपदावरून होणार पायउतार?, ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयची नजर

नवी दिल्ली | T-20 वर्ल्डकपसाठी नुकतीच भारतीय संघाची यादी जाहीर झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखील मेंटोरच्या भूमिकेत संघासोबत असणार आहे. मात्र आता विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे.

32 वर्षीय विराट कोहली, जो सध्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे आणि भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने 34 वर्षीय रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेणार असल्याचं, बीसीसीआयच्या सुत्रानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.

तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. कोहलीला असं वाटतं त्याच्या फलंदाजीला सर्व फॉरमॅटमध्ये अधिक वेळ आणि अधिक वेग आवश्यक आहे. विराट स्वतः याची घोषणा करेल. त्यामुळे विराट बॅटींगवर अधिक फोकस करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतो.

दरम्यान, विराट कोहलीनं गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी दीर्घ काळ चर्चा केली आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष विराटच्या निर्णयाकडे लागली आहे.

थोडक्यात बातम्या –   

रहाटणीतील ‘लेगसी ऑरा’ चा अनोखा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव!

पुण्यात बिग बास्केट कंपनीला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

“मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे”

“उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More