बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल येणार जीएसटीच्या कक्षेत?; न्यायालयाने सरकारला दिला ‘हा’ आदेश

मुंबई | पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला असतानाच तेल कंपन्यांकडून दररोज इंधन दरवाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधन दरवाढीवरून जनता रोष व्यक्त करत असताना केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचे ठोस पावलं उचलताना पाहायला मिळत नाही.

पेट्रोल आणि डिझेल हे वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील.

केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. मनिकुमार आणि न्यायमूर्ती शाजी पी. चाली यांच्या खंडपीठाने इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी मागणी होत असताना याबाबत येत्या सहा आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर केंद्र सरकार यावर सकारात्मक विचार करून सहा आठवड्यात पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 91 दिवसातील निच्चांकी, रूग्णसंख्येत 11 हजारांची घट

लसीकरण केलेल्या नागरिकांसाठी बँकेत जास्त व्याजदर तर मॅकडॉनल्ड्समध्ये घसघशीत सुट

ED ची मोठी कारवाई ; अविनाश भोसलेंची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता सील

“जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल,असं म्हटल्यास गैर काय?”

मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More