बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ‘या’ माजी मंत्र्याला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

बंगळुरु | तामिळनाडूचे माजी मंत्री आणि एआयएडीएमके नेते एम.मणिकंदन यांना बलात्काराच्या आरोपाखाली आज अटक करण्यात आली आहे. चेन्नई शहर पोलिसांनी एम. मणिकंदन यांना बगळुरू येथून अटक केली आहे. एका मलेशियन महिलेने एम.मणिकंदन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच मणिकंदन यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचं देखील महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

मलेशियन महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मनिकंदन यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी मनिकंदन यांची याचिका फेटाळली होती. यानंतर ते फरार झाले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या प्रकरणातील तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका योग्य नाही, असे न्यायाधीश अब्दुल कुद्दोस यांनी यावेळी म्हटले होते.

दरम्यान, माणिकंदन हे तमिळनाडू सरकारमध्ये आयटी मंत्री राहिले आहेत. मलेशियन महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मणिकंदन यांनी लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर जेव्हा ती महिला गर्भवती झाली, तेव्हा तिच्या इच्छेविरूद्ध मणिकंदनने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. माणिकंदनने तिला बर्‍याच वेळा गर्भपात करण्यास भाग पाडले होते.

थोडक्यात बातम्या – 

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

चिंताजनक! देशातल्या ‘या’ राज्यात आढळला ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

“सोनिया गांधींनी शब्द दिलाय, काँग्रेस शिवसेनेसोबत पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल”

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थीनीनं उचललं धक्कादायक पाऊल!

गरज असेल तरच घराबाहेर पडा, नियमांचं पालन करा- अजित पवार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More