बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी ! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई | बाॅलिवूडमधून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक टी रामा राव (T Rama Rao) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सध्या बाॅलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्यानं त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेता अनुपम खेर यांनी टी रामा राव यांच्या कुटुंबीयांकडून जारी करण्यात आलेलं स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली.

अनुपम खेर यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत म्हटलं की, अनुभवी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रिय मित्र टी रामा राव यांच्या निधनाबद्दल समजल्यावर खूप दुःख झालं. मला त्यांच्यासोबत ‘आखरी रास्ता’ आणि ‘संसार’मध्ये काम करण्याचं सौभाग्य लाभलं. या दुःखात मी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. शांती!

दिग्दर्शक टी रामा राव यांनी अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार केलं आहे. टी रामा राव यांनी 1966 ते 2000 या कालावधीत अनेक हिंदी, तेलगू सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

किरीट सोमय्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पुत्रालाही न्यायालयाचा मोठा दिलासा

राणू मोंडल झळकणार ‘या’ सुपरस्टारसोबत, नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल

“भाजपला पाच हजार वर्षांचा हिंदुत्त्वाचा इतिहास आहे”

‘ते’ वक्तव्य संजय राऊतांच्या अंगलट येणार?, न्यायालयात याचिका दाखल

“मंत्री धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More