बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! झी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन होणार

मुंबई | झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया गेली कित्येक वर्ष सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स इंडियाचं आता लवकर विलिनीकरन होणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाने विलिनीकरनाला मान्यता दिलीआहे.

हे विलिनीकरण कार्यान्वित करण्यासाठी झील व्यवस्थापन कार्य करेल, असं झी बिझनेसने स्पष्ट केलं आहे. तसेच हे विलिनीकरण झाल्यानंतर पुनीत गोयंका या कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून काम पाहतील, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या विलिनीकरणानंतर सोनी एंटरटेनमेंट यामध्ये बहुसंख्यांक भागधारक असेल. विलिनीकरणानंतर सोनी 11,605 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

दरम्यान, हे विलिनीकरन केवळ आर्थिक गोष्टी लक्षात घेऊन करण्यात आले नाही तर यामागे एक रणनिती देखील असल्याचं सांगण्यात येत आहे. मंडळाचा असा विश्वास आहे की, हे विलिनीकरण भागधारक आणि भागधारकांसाठी चांगले सिद्ध होईल.

थोडक्यात बातम्या – 

RBI ने लागू केले ‘हे’ नवीन नियम; 1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटमध्ये होणार हा मोठा बदल

नितीन गडकरी ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

धक्कादायक! कोरोना लस घेताना आतच तुटली सुई अन्…

गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन जप्त, अदानी म्हणाले…

‘…त्यांच्याकडे अमेरिका कट्टर शत्रू म्हणून पाहील’; बायडन यांचं मोठं वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More