इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!

Loksabha Election Result 2024 | देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला 298 धावांची आघाडी दर्शवत असून इंडिया आघाडीला 226 जागांवर आघाडी दिसून येत आहे. त्यामुळे, देशात सत्तास्थापनेच्या घाडमोडी वेगाने घडत असून बडे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

देशात मोठी उलथापालथ होणार?

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशातील राजकीय घडामोडी बदलत असल्याचं चित्र आहे. देशात महत्त्वाची राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र राज्यात भाजप आघाडीच्या जागा घटल्या आहे. त्यामुळे, नितीश कुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loksabha Election Result | नितीश कुमारांना ऑफर

त्यातच नितीश कुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना भेट नाकारल्याने त्यांच्या भूमिकेवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील बडे नेते नितीश कुमार यांच्या संपर्कात असून नितीश कुमार यांना थेट पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे, पुढील काही दिवसांत बिहारसह देशातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीश कुमारांनी भाजपसोबत जाऊन आघाडी केली. त्यानंतर, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. मात्र, आता इंडिया आघाडीकडील निकालाचे कल पाहाता नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीसोबत येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का; निलेश लंके विजयी

मोठी बातमी! पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाला मोठं यश; उधळला विजयी गुलाल

महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!

मोदी महाराष्ट्रात येऊन त्यांना म्हणाले लहान भाऊ!, आता तेच 18 हजारांनी मागे

धाराशिवमध्ये मशाल पेटणार?; ओमराजे निंबाळकरांची विजयाची औपचारीकता बाकी