बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांसाठी मोठी योजना, ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले….

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वीजबिल वसुली मोहिम सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. त्यातच आता वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी महावितरण कंपनीकडून दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावे योजना तयार करण्यात आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सदर योजनेची घोषणा केली आहे.

विलासराव देशमुख अभय योजनेनुसार उच्च दाब वीज ग्राहकांनी वीजबिल रक्कम एकरकमी भरल्यास पाच टक्के सुट देण्यात येणार आहे. लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीजबिल भरल्यास 10 टक्के सुट देण्यात येणार आहे. सदर योजनेत कृषीपंप ग्राहकांना कोणतीही सुट जाहिर करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत 32 लाख ग्राहकांकडे 9 हजार कोटींची थकबाकी आहे.

या योजनेमुळे राज्यातील बंद पडलेली कृषी, औद्योगिक आणि घरगुती वीज जोडण्या पुन्हा सुरू होतील. राज्यातील कायमस्वरूपी बंद पडलेले उद्योग, कृषी कनेक्शन सुरू होतील. राज्यात रोजगार निर्माण होऊन अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल, असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांकडून 9 हजार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.  वीज ग्राहकांकडून जर या योजनेचा लाभ घेण्यात आला तर 1 हजार 445 रूपयांची सवलत मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“काही लोक दाऊदची धुणीभांडी करतायेत ती आधी बंद करायला लावा”

Devendra Fadnavis : “अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही”

देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल, पाहा ‘तो’ व्हिडीओ

“हे सरकार बेवड्यांना अन् दाऊदला समर्पित, यांचा खरा चेहरा आता समोर आला”

“राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा भाजपचा डाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More