बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. यामुळे महाराष्ट्र, बिहारपाठोपाठ झारखंडच्या राजकारणात भूकंप आला आहे.

हेमंत सोरेन यांनी स्वतःला दगड खाण लीज वाटप केल्याचा आरोप भाजपने केला होता. सोरेन यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळातील खाण वनमंत्रीपद देखील आहे.

लोकप्रतिनिधी आणि लाभ कार्यालय कायदा, 1951 च्या कलम 9A चा हवाला देत भाजपने हेमंत सोरेन यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, सोरेन यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More