बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरुषोत्तम खेडेकरांच्या युतीच्या भूमिकेवर भाजपकडून मोठी प्रतिक्रिया!

पुणे | मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती करण्याचं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करावी. सध्याची ती गरज असल्याचं खेडेकरांनी म्हटलंय. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे अशा प्रकारे अनेक वर्षे आमची हेटाळणी देखील झाली. पण आता वेळ आलीये काहीतरी भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा विचार करावा, असं पुरूषोत्तम खेडेकर म्हणालेत. यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

संभाजी ब्रिगेडने असं वक्तव केलं असेल तर त्याचं स्वागतच असेल. महाविकास आघाडीला आरक्षण राखता आलं नाही हे मराठा समाजातील लोकांना समजलं आहे. निवडणुका लढावाव्या की नाही हे वरच्या पातळीवर निर्णय घेतील. मराठा समाजातील अजून किती बळी या सरकारला हवे आहेत हा माझा प्रश्न आहे. सरकारला जाग येत नसेल तर दुर्दैव आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘बिग बाॅस मराठी 3’ मध्ये झळकणार हे कलाकार?, संभाव्य नावं समोर

सलग दुसऱ्या दिवशी सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा!

मिलिंद नार्वेकरांचा वाढता दबदबा, आता पुन्हा मिळाली ही मोठी जबाबदारी!

आधी संघ-भाजपला विरोध, आता युती!; पुरुषोत्तम खेडेकरांनी सांगितलं खरं कारण

“कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More