16 वर्षांपुर्वीच्या ‘त्या’ खटल्याप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता!

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 2008 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणी राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. इस्लामपूर न्यायालयाने या प्रकरणी निर्णय दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात गेल्या 16 वर्षांपासून याबाबतचा खटला सुरू होता. शिराळा न्यायालयाने या प्रकरणी राज ठाकरेंना दोन वेळा अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. आता, तब्बल 16 वर्षानंतर या गुन्ह्यातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नाव वगळण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांना मोठा दिलासा

या गुन्ह्यातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2008 साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा शिराळ्यात 2008 साली गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

मनसे आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्यातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2007 मध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर सुरुवातीलाच म्हणजेच 2008 मध्ये राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत मराठी मुलांसाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

2008 साली मध्ये रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. या भरतीमध्ये मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र, शिराळा येथे आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. त्यामुळे शेंडगेवाडी येथे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

विशेष म्हणजे यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनेसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयात आरोपपत्रही दाखल झाले. याच प्रकरणी इस्लामपूर न्यायालयाने निकाल देत राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली आहे.

News Title –  big relief for Raj Thackeray in 16 year old case

महत्त्वाच्या बातम्या-

“ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की”; ‘धर्मवीर-2’चा टीझर पाहिलात का?

वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणी मोठी अपडेट; शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

आनंदवार्ता! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

“बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…”; MS धोनीच्या वाढदिवशी सलमान खानची खास पोस्ट

आज ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत अचानक वाढ होईल!