नवीन वर्षात सरकार देणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | 2022 वर्ष मावळत आलं आहे. त्यातच येणाऱ्या नवीन वर्षात केंद्र सरकार(Central Goverment) सरकारी कर्मचाऱ्यांना(Central Employee)गुड न्यूज देऊ शकते, अशा चर्चा आहेत. म्हणूनच जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

सध्या अशी माहिती समोर आली आहे की, सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे तीन महत्वाचे निर्णय घेण्याची तयारीत आहे. सरकार नवीन वर्षाच्या मुहूर्तावर किंवा 2023 च्या अर्थसंकल्पात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सध्या महागाईचा दर पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते, अशा चर्चा आहेत. असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्याबद्दलही निर्णय घेतला जाऊ शकतो. अठरा महिन्यांच्या थकीत डीए काढला तर तो हजारो रूपयांपासून लाखो रूपयांपर्यंत पोहचू शकतो, त्यामुळं कर्मचाऱ्यांना डीए(Dearness Allowance) बद्दलच्या निर्णयाचीही आस लागली आहे.

केंद्रीय कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. त्यामुळं पुढील वर्षीच्या अर्थ संकल्पात याबाबत निर्णय होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-