मुंबई | अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ऐन सणासुदीच्या काळात लालपरी म्हणजेच एसटी बसचा संप पुकारला होता. सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होता. त्यांच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले असते, मात्र सरकारशी झालेल्या चर्चेनंतर सदावर्ते यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
सदावर्तेंनी काय निर्णय घेतला?
दिवाळीच्या तोंडावर गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची एकी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी त्यांची एसटी कष्टकरी जनसंघ नावाची संघटना आहे, याआधी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात देखील ही संघटना उतरली होती. यंदाच्या दिवाळीत देखील या संघटनेनं सदावर्तेंच्या नेतृत्वाखाली संप करण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, एसटीच्या ताफ्यातील खिळखिळ्या झालेल्या बस काढून टाकाव्यात तसेच नवीन बसगाड्या एसटीच्या ताफ्यात आणाव्यात, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. ऐन दिवाळीत हा संप होणार असल्याने सरकारने थेट सदावर्ते यांच्याशी चर्चेची भूमिका घेतली.
सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याशी चर्चा केली, चर्चेनंतर सदावर्ते यांनी संप मागे घेतला. नेमकं काय घडलं बैठकीत हे उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
बैठकीनंतर उदय सामंत म्हणाले की, “एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यांना संपूर्ण मदत करण्याची आमची भूमिका आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मंत्र्याचा तोल सुटला!, नको ते कृत्य करताना व्हिडीओ व्हायरल… पाहा व्हिडीओ
बारामती लोकसभा जिंकू म्हणणाऱ्या भाजपसाठी मोठी गुड न्यूज!
बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं
भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा
मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा