विनोद तावडेंचं ‘राजकीय वजन’ वाढणार, भाजपकडून मोठी जबाबदारी

Vinod Tawde | विधानसभा मतदानाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यात विनोद तावडे यांच्याशी संबंधित एका प्रकरणामुळे तर राज्यभर खळबळ उडाली होती. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील विवांत या हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी विनोद तावडे हे विरोधकांकडून चांगलेच टार्गेट झाले होते. अशात विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे त्यांचं ‘राजकीय वजन’ वाढणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्रीपदावरून संभ्रम असताना विनोद तावडेंना ही जबाबदारी दिल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगल्या आहेत. विनोद तावडे हे पक्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक येतात. पक्षातील सर्वोच्च नेतृत्वाच्या भूमिकेसाठी त्यांच्या नावाचा अगोदर विचार केला जातो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, मराठी भाषा आदी महत्त्वाची खाती होती. (Vinod Tawde)

दरम्यान, कालच (27 नोव्हेंबर) विनोद तावडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात तावडे आणि अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहितीही समोर येत आहे. तावडे यांनी शाह यांची भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्कला उधाण आले होते. अशात त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली आहे.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कुणाला?

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. (Vinod Tawde)

आज (28 नोव्हेंबर) अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आता काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पद तसेच इतर मंत्रीपदाबाबत निर्णय होण्याची दाट संभावना आहे.

News Title :  Big responsibility from BJP to Vinod Tawde

महत्वाच्या बातम्या –

आधी डिलीट केलं ट्विट, आता म्हणतात बाबा तुमचा अभिमान वाटतो!

मध्यरात्री दिल्लीत खलबतं, ‘या’ बड्या नेत्याने अमित शाहांची भेट घेतल्याने CM पदाचा सस्पेन्स वाढला

राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट उसळणार, हवामान विभागाचा महत्वाचा इशारा

“मोदी आणि शाह यांच्यावर विश्वास ठेऊन माझे बाबा..”; श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट चर्चेत

आज ‘या’ राशींवर स्वामींची असणार अपार कृपा, दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येणार!