राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील माने यांना मोठी जबाबदारी!

Pune | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार सुनील माने (Sunil Mane) यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्तेपदी सुनील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुनील माने (Sunil Mane) यांची नियुक्ती केल्याचं पत्र दिलं.

सुनील माने यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी राज्यात सर्वप्रथम भाजपचा राजीनामा देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात सक्रीय भाग घेतला. सुनील माने यांनी पुणे, मुंबई आणि नवी दिल्ली येथे पत्रकार म्हणून काम केलं आहे. ॲग्रोवन या कृषी दैनिकाची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

सुनील माने यांनी सामाजिक आणि राजकीयसह विविध विषयात अभ्यास असून त्यांच्या भूमिका ते आग्रही पद्धतीने सरकार आणि लोकांपुढे मांडत असतात. स्थानिक प्रश्नांवर देश आणि परदेशातील विविध विषयांमध्ये सुनील माने यांनी काम आणि लिखाण केलं आहे. त्यांनी सुमारे बावीस देशांचे अभ्यास दौरे केले आहेत.

आणखी जोमाने काम करण्याची संधी पक्षाने दिली- सुनील माने

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण, आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्त्वात काम करण्याची संधी लोकसभा निवडणुकीपासून मला मिळाली. शरद पवारसाहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्षा  सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्त्व व मार्गदर्शनाखाली आणखी जोमाने महाराष्ट्रासाठी काम करण्याची संधी मला पक्षाने आज दिली, अशी प्रतिक्रिया सुनील माने यांनी दिली. तसेच त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार देखील मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्तेपदी माझी आज पक्षनेतृत्त्वाने केलेली नियुक्ती वाढत्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. राज्याच्या सध्याच्या कठीण काळात महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडत राहणे आणि त्यासाठी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करत, पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी सदैव कार्यरत राहणे हे ध्येय राहील, असं सुनील माने यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ

लाडकी बहिण आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडून सर्वात मोठी घोषणा!

महायुतीचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री कोण?; अमित शहांनी अखेर सांगूनच टाकलं

‘माझं आणि हार्दिकचं अजूनही…’; घटस्फोटानंतर नताशाकडून नवा खुलासा

‘महिलेला खोलीत आणलं, माझे कपडे काढले’; आमदाराच्या मुलासोबत घडला भयंकर प्रकार