राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद नाही?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली अडचण

Ajit Pawar | आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. तसेच एनडीएमधील घटक पक्षांचे खासदार देखील मंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. मात्र एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला संधी मिळालेली नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. मात्र दुपारी 2 पर्यंत देखील राष्ट्रवदी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला कोणताही फोन आलेला नाही. यामुळे अनेक-तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात होते. अखेर यावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद नाही?

राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम होते. मात्र प्रफुल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं अडचण येत होती, असं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं.

आमच्या वतीने राष्ट्रवादीला एक जागा ऑफर करण्यात आली होती. परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. ते अगोदर मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

निकष मोडता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येणार नाही. पण मला विश्वास आहे की, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी त्यांचा विचार होईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही इच्छुक नेते हे वरिष्ठ असल्याने राज्यमंत्रीपद देण्यात देखील महायुतीला अडचणी येत आहेत. त्यातच अजून एक चर्चा होते आहे. जर राष्ट्रवादीला संधी दिली गेली तर इतर पक्ष नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, देशात 1 सदस्य निवडून आलेले 7 पक्ष (Narendra Modi Cabinet ) आहेत. आता पुढे याबाबत काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री करा’; बीडमध्ये झळकले बॅनर्स

मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण

‘सगळ्याचं श्रेय पुणेकरांना…’, मंत्रीपदाबाबत बोलत असताना मोहोळ भावूक

मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये लागली मंत्रि‍पदाची लॉटरी!

मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना डच्चू, भागवत कराडांचाही पत्ता कट