बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ट्रायडंट हॉटेलमध्ये 100 दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात एनआयएचा मोठा खुलासा

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकासंबंधी सध्या राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयए चौैकशी करत आहे. एनआयएने तपास चालू केल्यापासून या प्रकरणात अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच बरोबर एनआयएने वेळोवेळी अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. या प्रकरणाात एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक देखील केली आहे. तर एनआयएकडून चौकशीत मोठा खुलासा झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

नरिमन पाँईट मध्ये असलेल्या ट्रायडंट हाॅटेलमध्ये सचिन वाझे वास्तव करत होते अशी धक्कादायक माहिती मिळत आहे. सचिन वाझे यांनी ही रूम एक दोन नव्हे तर तब्बल 100 दिवसांसाठी बुक केली होती. एवढं नाही तर ही रूम सी फेसिंग आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात तपास यंत्रणेचा संशय सचिन वाझेंवर आणखीनच बळावला आहे.

झवेरी बाजारात ज्वेलरीचं शो रूम असलेल्या एका व्यावसायिकाने ही रूम वाझेंसाठी बूक केली असल्याची माहिती मिळत आहे. तर या व्यावसायिका विरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ही रूमची बुकींग करण्यासाठी 25 लाख देखील भरण्यात आले होते. तर ओळखपत्र देताना खोटं आधार कार्ड देण्यात आल्याचंही समोर आलं आहे. तर हाॅटेलच्या सीसीटिव्हीमध्ये वाझे 5 बॅग घेऊन जाताना दिसत आहेत.

दरम्यान, या सीसीटिव्हीमध्ये आणखी एक महिला नोटा मोजण्याची मशिन घेऊन जाताना दिसत आहे. महिलेनं घातलेल्या मास्कमुळे अद्याप पोलिसांना तिची ओळख पटवता आली नाही.

थोडक्यात बातम्या-

संतापलेल्या हत्तीचा फोटो काढणं बेतलं असतं जिवावर, पाहा व्हिडिओ

‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20 पैशांत धावेल एक किलोमीटरपर्यंत; जाणून घ्या किंमत

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत’; ‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर

मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More