बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्त्वाची बातमी ! डी गँग संदर्भात NIA च्या तपासात धक्कादायक खुलासा

मुंबई | दहशतवादी कारवाया करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या डी गँग संदर्भात NIA च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. दाऊद इब्राहिम देशातील राजकीय नेते टार्गेट करत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सतत भारताविरोधात काहीतरी कुरापती करत आहे.

NIA ने 9 मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर एकूण 27 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या धाडीनंतर NIA ने 57 लोकांना चौकशीकरिता बोलावले होते. संशयितांची एनआयए कसून चौकशी करत आहे. छोटा शकिलचे नातेवाईक आरीफ आणि शब्बीर शेख यांच्याविरोधात ठोस पुरावे सापडलेले आहेत.

1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकील मार्फत डी गॅंगच्या संपर्कात आहेत. त्यांना  13 मे रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

दरम्यान, हिंदूत्ववादी राजकीय नेते डी गँगच्या टार्गेटवर आहेत. आरिफ आणि शब्बीर हे छोटा शकिलच्या मार्फत दाऊदच्या संपर्कात होते. डी गँगने भारतामध्ये घातपात घडविण्याचा प्रयत्न केला होता. टार्गेटवर असणाऱ्या राजकीय नेत्यांची लिस्ट आहे जी या दोघांना माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ ठिकाणी इमारतीला भीषण आग, अनेकजण जखमी

शिवाजी महाराजांचा अजेंडा हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा होता- कालीचरण महाराज

मोठी बातमी ! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

मोठी बातमी ! रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली समोर

राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More