पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विरोधकांनी फडणविसांना घेरलं; सभागृहात जोरदार खडाजंगी

Pune Car Accident | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पुणे अपघात प्रकरण प्रचंड गाजलं. या प्रकरणी विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच घेरलं. विरोधी नेत्यांनी याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणी आता सर्व खुलासा फडणवीस यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलावर काही अपवाद वगळता योग्यप्रकारे कारवाई केल्याचा दावा केला. तसंच, बालहक्क न्यायालयाच्या कलम 20 नुसार त्याला सज्ञान समजून हे प्रकरण कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंती पोलिसांनी सुरुवातीलाच केल्याचेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी फडणविसांचा खुलासा

अल्पवयीन आरोपी मुलगा जेव्हा गाडी चालवत होता, तेव्हा गाडीचा वेग हा 110 KMPH इतका होता. त्यामुळे संबंधित मुलगा हा अत्यंत वेगाने गाडी चालवत होता, हे स्पष्ट झाले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. याचबरोबर ज्या बारमध्ये अल्पवयीन मुलाने दारू पिली, तेथील सीसीव्ही फुटेज आणि बिलही जप्त करण्यात (Pune Car Accident ) आल्याची माहिती त्यांनी दिली.

ससूनमधील डॉक्टरांबाबतही फडणवीस यांनी मोठी कबुली दिली. मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळले नाही, असे दिसून आले तेव्हा पोलिसांना स्ट्राईक झालं काहीतरी गडबड आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले. मात्र, टेस्टसाठी देण्यात आलेले रक्त वेगळ्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले. त्यामुळे ससूनमधील डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

ड्रग्सच्या मुद्यावरून नाना पटोले यांचा सवाल

पुढे कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी ड्रग्स प्रकरणावरून काही सवाल उपस्थित केले. आरोपी दारू प्यायला या पेक्षा ड्रग्सचा विषय जास्त महत्वाचा आहे. ससूनशी ललित पाटीलचं नातं जोडलं गेलं. या घटनेतही ससून हॉस्पिटलचं नातं जोडलं गेलं. डॉ. तावडे कोण आहे? फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट अजूनही आला नाही, तरीही तुम्ही संबंधितांना क्लीनचिट दिली आहे. डॉ. तावडे यांना कुणाचा पाठिंबा होता?ललित पाटीलला व्हीआयपी ट्रीटमेंट कशी दिली? याची उत्तर द्या. अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

या प्रश्नाला देखील फडणवीस यांनी उत्तर दिले. डॉ. तावडे, घाटकांबळे यांना सस्पेंड केलं आहे. ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं हे मी सांगितलं होतं. ड्रग्सचा मुद्दा हा आपल्या पुरता विषय मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे केंद्राने सर्व राज्याची बैठक घेतली. विविध राज्याच कोऑर्डिनेशन सुरू आहे. (Pune Car Accident ) ते इंटिलिजन्स आल्यानेच आपण कारवाई करत आहोत, असं फडणवीस म्हणाले.

News Title –  Big revelation of Devendra Fadnavis in Pune Car Accident case

महत्त्वाच्या बातम्या-

चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर

“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य

अलर्ट! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

“अजित पवारांचे 22 आमदार संपर्कात”; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता?