‘योग्य वेळ पाहिली आणि…’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
नागपूर | 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात अखेर शिंदे सरकार स्थापन झालं. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व समर्थक आमदारांच्या बंडाळीमुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली होती. 10 दिवसांच्या या राजकीय घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखेर भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस मंगळवारी नागपूरात पोहोचले. यावेळी नव्या सराकरबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक खुलासे केले आहेत.
महाविकास आघाडीच्या पहिल्या दोन महिन्यातच खदखद लक्षात आल्याचं फडणवीस म्हणाले. तर मी सर्व प्रकारावर नजर ठेवून होतो. योग्य वेळ पाहिली आणि करेक्ट कार्यक्रम केला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर ही सर्व सस्पेंस फिल्म असून हळूहळू सर्व समोर येईल, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, 2019 सालीच भाजपला लोकांची पसंती मिळाली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. तर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रवास पूर्ण होणार. ही टर्म आम्ही पूर्ण करणार, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
थोडक्यात बातम्या-
बिअर तुमच्या शरीरासाठी ठरू शकते वरदान; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!
‘…तर राजकारण सोडून घरी बसेन’; शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य
भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष?; ‘या’ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा
“कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू”
Comments are closed.