बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एनआयए’चा मोठा खुलासा! CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच!

मुंबई | ‘अँटिलिया’च्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, ‘अँटिलिया’ बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं ‘एनआयए’ने आता स्पष्ट केलं आहे. ‘एनआयए’ने यासंदर्भात माहिती दिली असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचं देखील ‘एनआयए’ने सांगितलं आहे.

या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ करत आहे. मुंबई सीआययूचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अँटिलिया’ बाहेरचं एक सीसीटीव्ही फूटेज ‘एनआयए’ने तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावर देखील व्हायरल होऊ लागलं. सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE किट घालून ‘अँटिलिया’च्या बाहेरून जात असल्याचं दिसत आहे.

मात्र, आता हे पीपीई किट नसून तो कुर्ता-पायजमा असल्याचं ‘एनआयए’ने स्पष्ट केलं आहे. ते सचिन वाझेच असून त्यांनी आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने झाकून घेतला आहे. आपली हालचाल कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून सचिन वाझेंनी कुर्ता-पायजमा घातल्याचं देखील, ‘एनआयए’ने सांगितलं आहे.

दरम्यान, ‘एनआयए’ने सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप जप्त केला होता. मात्र, या लॅपटॉपमधील सर्व डाटा आधीच डिलीट झाला होता. सचिन वाझे यांच्याकडे चौकशीदरम्यान त्यांच्या मोबाईल फोनची मागणी केली असता तो हरवल्याचं त्यांनी सांगितलं. पण तो हरवला नसून त्यांनी कुठेतरी फेकून दिला आहे, असं देखील ‘एनआयए’चं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या –

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाल्या…

काय सांगता! शेतकऱ्यानं बनवली चक्क 300 किलोमीटर धावणारी इलेक्ट्रिक कार

तरुणीचा ‘हा’ पॅराग्लायडिंग व्हिडिओ होतोय खुपचं व्हायरल; विनंती पाहुन हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More