अजित पवार मुख्यमंत्री बनणार?; शरद पवारांचा मोठा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री बनावं अशी इच्छा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी याआधी बोलून दाखवली आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंनी (Mla Nilesh Lanke) आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच आणि तेही अजितदादाच असं जाहीरपणे बोलून दाखवलंय.

अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यासाठी कामाला लागा असं आवाहन निलेश लंकेंनी कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंके ज्यावेळी बोलत होते त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. यावर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे तेवढं संख्याबळ नाही. संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन तसा निर्णय आम्ही घेतला असता, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पष्ट केलं आहे.

शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. शरद पवारांनी मोदींच्या मुंबई दौऱ्यावर देखील भाष्य केलं.

दरम्यान, मुंबई मनपाची निवडणूक (Bmc Election) पाहून मोदी महाराष्ट्रात येत आहेत, हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही. पण ते इथे येऊन राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा, असं शरद पवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-