बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

पुणे | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेले तीन दिवस सोन्याच्या दरात सलग वाढ अनुभवायला मिळाली आहे. आज देखील सोन्याच्या दरात प्रती तोळ्यामागे तब्बल 310 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 870 रुपये प्रती तोळा आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरात देखील आज मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आज पुण्यातील सराफा बाजारात प्रती किलो चांदीमागे 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 1 हजार रुपयांच्या वाढीसह आज पुण्यात चांदीचा दर 68 हजार 200 रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

Maharashtra HSC Result 2021 : ऑगस्टमध्ये जाहीर होणार बारावीचा निकाल

शरद पवार आणि नितीन गडकरींची दिल्लीत भेट; चर्चांना उधाण

‘या’ कारणामुळे शेतकऱ्यानं शेतात लावला चक्क सनी लिओनीचा पोस्टर!

“भाजप आणि काँग्रेसची आतून सेटिंग; जावई तुरुंगात जाईल तेव्हा मोदी सरकार पडेल”

पुणे मेट्रोच्या कामाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More